पनवेल मध्ये श्री स्वामी समर्थ प्रगट दीन सोहळा साजरा





पनवेल दि. १८ ( संजय कदम ) : दरवर्षी प्रमाणे यंदाही पनवेल शहरातील गावदेवी पाडा येथील श्री स्वामी समर्थ मठ ( मंदिर ) येथे प. पु. सद्गुरू नाना महाराज परांजपे यांच्या कृपाशीर्वादाने श्री स्वामी समर्थ प्रगट दीन सोहळा साजरा केला जाणार आहे . 



                गुरुवार दि २३/०३/२०२३ रोजी शहरातील गावदेवी पाडा येथील श्री. स्वामी समर्थ मठ ( मंदिर ) येथे सकाळी ५.०० श्री स्वामी समर्थ महाराज ची काकड आरती. सकाळी ७.३० नित्य नैमत्तिक पूजा, लघु रूद्र, गुरू पाद्यपूजन आणि आरती, स्वामी प्रगट दीन आध्यय वाचन, स्वामी प्रगट दीन सोहळा, श्री दत्त गायत्री होम, श्री स्वामी समर्थ महिला मंडळ चे भजन, श्री गुरुवर्य मठाधिपती श्री सुधाकर भाऊ यांचे प्रवचन, महाआरती व महाप्रसादाचे आयोजन आगरी समाज हॉल येथे करण्यात आले आहे . तसेच 



रात्री १० पासून भजन सोहळा संपन्न होणार आहे . तरी स्वामी भक्तांनी या सोहळ्यास उपस्थिती ठेवावी असे आवाहन कु . अवधूत सुधाकर घरत यांनी केले आहे . 



थोडे नवीन जरा जुने