महिला बेपत्ता

पनवेल दि. १८ ( संजय कदम ) : पनवेल रेल्वे स्टेशन पार्किंग समोरील झोपडपट्टीत राहणारी एक महिला कोणास काही एक न सांगता कोठेतरी निघून गेल्याने ती हरविल्याची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे .                          सौ. जिलू गोविंद सलाड ( वय २२ ) , उंची ४ फूट , रंग सावळा , डोक्यावरील केस काळे लांब ,नाक सरळ , नाकात मुरणी ,गळ्यात साधे मंगळसूत्र ,चेहरा गोल असून अंगात लाल रंगाचा पंजाबी ड्रेस ,लाल रंगाचा सलवार त्यावर काळे ठीपके व मेंहदी रंगाची ओढणी ,पायात काळ्या रंगाची चप्पल, तिला बंजारा व हिंदी भाषा अवगत आहे . या महिले बाबत कोणाला अधिक माहिती असल्यास पनवेल शहर पोलीस ठाणे फोन - ०२२-२७४५२३३३ किंवा पोलीस हवालदार सतीश जवरे यांच्याशी संपर्क साधावा .

 

थोडे नवीन जरा जुने