६ तोळे वजनाची सोन्याची गंठण खेचून दोघे जण झाले पसार







पनवेल दि. १८ ( संजय कदम ) : बस स्टॉप वर रिक्षाची वाट पहात उभ्या असलेल्या एका महिलेच्या गळ्यातील ६ तोळे वजनाची सोन्याची गंठण खेचून दोघे जण बुलेट मोटार सायकलीवरून पसार झाल्याची घटना पनवेल जवळील नावडे गाव बस स्टॉप येथे घडली आहे


 . 
                        मीरा घरत ( वय ५७ ) या बस स्टॉप वर रिक्षाची वाट पहात उभ्या असताना काळ्या रंगाच्या बुलेट वरून आलेल्या मोटार सायकलींवरील मागे बसलेल्याने त्यांच्या गळ्यातील ८० हजार रुपये किमतीची सोन्याची गंठण खेचून ते पसार झाल्याने याबाबतची तक्रार तळोजा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे .


थोडे नवीन जरा जुने