युवा कार्यक्रम व खेळ मंत्रांलय, भारत सरकारच्या नेहरू युवा केंद्राचा उत्कृष्ट युवा मंडळ पुरस्कार प्राप्त महाराष्ट्र युवा प्रतिष्ठान पाणदिवे या सामाजिक संस्थेच्या वतीने जाणिव सामाजिक सेवाभावी संस्था उलवे- पनवेल या संस्थेला समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
तसेच शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेले
डॉ. आमोद ठक्कर यांना स्वामी विवेकानंद आदर्श राज्य शिक्षक पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.
यावेळी साई देवस्थानचे अध्यक्ष रविशेठ पाटील यांनी महाराष्ट्र युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष मनोज पाटील यांच्याही गेल्या २५ वर्षातील सेवाभावी कार्याचा आलेख पाहता तसेच महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागातर्फे क्रांतिज्योती सावित्रामाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्काराने सन्मान झाल्याबद्दल त्यांनाही साई देवस्थानच्या वतीने साई सन्मान पुरस्कार देवून गौरविण्यात आले.
रायगड जिल्हास्तरिय खुल्या निबंध स्पर्धेचे बक्षिस वितरण समारंभाच्या वेळी सर्व विजेत्या स्पर्धकांना बक्षिस वितरण कार्यक्रम दरम्यान हा पुरस्कार सोहळा संपन्न झाला.
यावेळी साई देवस्थानचे संस्थापक अध्यक्ष रविशेठ पाटील, देवस्थानचे ट्रस्टी गुरूवर्य मो. का. मढवी गुरूजी, माजी भारतीय सैनिक निलेश म्हात्रे, राज्य आदर्श शिक्षक विद्याधर पाटील, रायगड भूषण राजू मुंबईकर, पर्यावरण प्रेमी धनंजय तांबे, नेहरू युवा केंद्राचे माजी राष्ट्रीय सेवाकर्मी आकाश घरत, वटवृक्ष सामाजिक संस्थेचे अध्यक्ष किरण मढवी, जाणीव संस्थेचे अध्यक्ष सुनिल ठाकूर, दिनेश पाटील, डॉ. विजय हंकारे, चिंतामण पाटील, आदी मान्यवर उपस्थित होते.
Tags
उरण