पाताळगंगा : ३ मार्च ,खालापूर तालुक्यातील माडप -खरसुंडी या मार्गावरील असलेले वळण हे धोक्याचे ठरत असून,या मार्गावरून अनेकांना प्राण गमवावे लागले आहे.मात्र या कडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे या ठिकाणी सातत्याने आपघाताची मालिका सुरुच आहे.मात्र असे असूनही या कडे दुर्लक्ष केले जात आहे.या ठिकांणी झाडे आणि रस्त्याच्या बाजूला टेकडी असल्या कारणामुळे या वळणाच्या मार्गावर समोरून येणारे वाहन निदर्शनास येत नसल्यामुळे अपघाताची मोठी समस्या निर्माण होत आहे.
माडप या गावापासून २ किमी.खरसुंडी येथे माध्यमिक शाळा,तसेच नव्याने निर्माण झालेली लहान मुलांची शाळा असून माध्यमिक शाळेत विद्यार्थी चालत जाणे पसंद करीत असतात.तसेच या शाळेत लहान मुले खाजगी वहनांने प्रवास करीत असतात.परिणामी हा वळणाचा रस्ता शालेय विद्यार्थीसाठी आता धोकादायक ठरत आहे.या वळणाच्या ठीकाणी अनेक वेळा अपघात घडल्याचे प्रवासी आणि विद्यार्थी यांच्याकडून सांगण्यात येत आहे.
मात्र असे तरी सुद्धा या मार्गावरून प्रवास करणारे नागरिक चिंताग्रस्त झाले आहे. सावरोली ते खारपाडा या परिसरात औद्योगिकरण मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे वाहन चालक अति वेगाने वाहन चालवत असतात.परिणामी या मार्गावर असलेल्या वळणाचा अंदाज न लागल्याने सामान्य नागरिकांची प्राणही जाण्याची वेळ आली आहे.या वळणाचा माहिती देणारा साधा सूचना फलकसुद्धा बसविण्याची तसदी संबंधित खात्याने घेण्यात आलेली नाही.नाही यामुळे गेले अनेक वर्षात खरसुंडी वळण आता हे आपघाताचे लक्षण ठरत आहे.
Tags
पाताळगंगा