देवन्हावे येथील अभि युवा ग्रुप चा स्तुत्य उपक्रम , दहावीच्या विद्यार्थ्यांना परिक्षेसाठी जाण्या - येण्याची व्यवस्था






काशिनाथ जाधव : प्रतिनिधी
पाताळगंगा : ३ मार्च, दहावीची परिक्षा म्हणजे विद्यार्थ्यांची यशाची पायरी मात्र ही परिक्षा देतांना वेळेवर पोहचता यावे.या उद्दात हेतूने श्री शिव छत्रपती विद्यालय देवन्हावे शाळेतील ३० विद्यार्थ्यांना ९ दिवस पेपरला जाण्या येण्याची मोफत व्यवस्था अभि युवा ग्रुप देवन्हावे यांच्या माध्यमातून करण्यात आल्याने अभि युवा ग्रुपच्या सामाजिक बांधिलकीचे विद्यार्थी व पालकासह शिक्षकांनी कौतुक करीत आहे


.  
          यावेळी सामाजिक कार्य अभि युवा ग्रुप देवन्हावे वर्षानुवर्षे आपला मित्र कै.अभिषेक तावडे यांच्या स्मरणार्थ विविध उपक्रम करीत आहे. विद्यार्थ्यांचा अमुल्य असा वेळ परिक्षेला जाण्या येण्याच्या प्रवासातच वाया जात असतो. त्यामुळे मुलांच्या अभ्यासावर परिणाम होत असतो म्हणून श्री शिव छत्रपती विद्यालय देवन्हावे शाळेतील विद्यार्थ्यांचा वेळ वाया जाऊ नये यासाठी जाण्या येण्याची व्यवस्था अभि युवा ग्रुप देवन्हावे यांच्या माध्यमातून हा उपक्रम राबविला आहे.


            दहावीची परिक्षा ही २ मार्च पासून सुरु होत असून गावापासून ते केंद्राचे अंतर खुप असल्यामुळे दरवर्षी प्रथा याही वर्षी सुरू ठेवल्याने अभिषेक तावडे या मित्राच्या आठवणींचा उजाळा मिळाल्यांचे पहावयास मिळाले असे मत अभि युवा ग्रूप चे सामाजिक कार्यकर्ते रमण तावडे व अभि युवा सदस्य ओमकार वाणी, सिद्धीक बारस्कर, अतिश पाटील, अँड.जयेश तावडे, यश पाटील, संदीप नलावडे, राज पाटील यांनी मुलांना पेढे भरवून तोंड गोड केले व परिक्षेसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच श्री शिव छत्रपती विद्यालय देवन्हावेचे शिक्षक दिवटे सर, पगारे मॅडम यांनी अभि युवा ग्रुपच्या सर्व सदस्यांचे आभार मानत सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले.


            

थोडे नवीन जरा जुने