पोलारिस कंपनी गेट समोर कामगारांनी केले गेट बंद आंदोलन.








कंपनी प्रशासनाचा आडमुठेपणा.
कंपनी प्रशासनाचे कामगारांच्या मागणीकडे जाणून बुजून दुर्लक्ष.
सर्वपक्षीय पदाधिकारी कार्यकर्त्यांचा आंदोलनाला जाहिर पाठींबा.
लेखी आश्वासनाशिवाय मागे न हटण्याचा कामगारांचा निर्धार.
गेट बंद आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद.



उरण दि 3 (विठ्ठल ममताबादे ) कामगारांच्या कोणत्याही मागण्या मान्य करत नसल्याने उरण तालुक्यातील भेंडखळ ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या पोलारीस लॉजिस्टिक पार्क (सी डब्लू सी) या कंपनी विरोधात स्थानिक भूमीपुत्र असलेल्या व ज्यांच्या जमिनी या कंपनीसाठी संपादित झाल्या अशा बेरोजगार युवकांनी पोलारिस लॉजिस्टिक पार्क (सीडब्लू सी) कंपनीच्या मनमानी व हुकूमशाही कारभाराचा निषेध करत, विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी सोमवार दि 27 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी 9 वाजल्यापासून साखळी उपोषणाला सुरवात केली.



 साखळी उपोषण सुरु असूनही कंपनी प्रशासनाचे एक सुद्धा अधिकारी साखळी उपोषण स्थळी फिरकला नाही. साधी कामगारांची विचारपूस सुद्धा केली नाही. जाणून बुजून कंपनी प्रशासनाने 502 कामगारांच्या साखळी उपोषणाकडे जाणून बुजून दुर्लक्ष केल्याने कामगारांनी शेवटी गेट बंद आंदोलनाची हाक दिली तरीही प्रशासन कोणत्याही प्रकारे चर्चेस तयार नसल्याने शेवटी शुक्रवार दि.3 मार्च 2023 रोजी सकाळी 10 वाजता कामगारांनी सर्वच राजकीय पक्षाच्या



 पाठिंब्याने,सहकार्याने रायगड श्रमिक संघटना तसेच न्यू मेरिटाईम ऍण्ड जनरल कामगार संघटनेच्या नेतृत्वाखाली सी ब्लू सी लॉजिस्टिक पार्क नोकरी बचाव कामगार समिती भेंडखळच्या माध्यमातून पोलारीस कंपनीच्या गेटसमोरच उन्हात बसून, भूकेची तहानाची पर्वा न करता गेट बंद आंदोलन करून आपला जाहिर निषेध व्यक्त केला. जोपर्यंत मागच्या पूर्ण होत नाहीत, लेखी आश्वासन मिळणार नाही तोपर्यंत गेट बंद आंदोलन सुरूच ठेवू असा निश्चय यावेळी बेरोजगार कामगारांनी केला.




सदर गेट बंद आंदोलन सर्वपक्षीय असल्याने या आंदोलनाला माजी आमदार तथा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे )रायगड जिल्हा प्रमुख मनोहरशेठ भोईर,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस प्रशांत पाटील,शिवसेना (बाळासाहेबांची शिवसेना )पक्षाचे रायगड उपजिल्हा प्रमुख अतुल भगत, काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत, मनसेचे रायगड जिल्हाध्यक्ष संदेश ठाकूर , आरपीआयचे तालुका उपाध्यक्ष शिवाजी ठाकूर,आम आदमी पार्टीचे उरण विधानसभा अध्यक्ष- संतोष भगत, भाजप कार्यकर्त्या तथा भेंडखळ ग्रामपंचातच्या विद्यमान सरपंच मंजिता पाटील, जेएनपीटीचे माजी विश्वस्त तथा कामगार नेते




 काँग्रेड भूषण पाटील, कामगार नेते महादेव घरत, ज्येष्ठ साहित्यिक एल बी पाटील , न्यू मेरिटाईम अँड जनरल कामगार संघटनेचे सरचिटणीस वैभव पाटील,उरण सामाजिक संघटनेचे अध्यक्ष सुधाकर पाटील,पागोटेचे सरपंच कुणाल पाटील , सामाजिक कार्यकर्ते यशवंत म्हात्रे, शेतकरी कामगार पक्षाचे महिला तालुकाध्यक्ष सीमा घरत,उरण तालुका चिटणीस विकास नाईक यांच्या सह विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते , विविध सामाजिक संस्था संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी गेट बंद आंदोलन स्थळी प्रत्यक्ष भेट देऊन या आंदोलनाला जाहिर पाठिंबा दिला


.पोलीस प्रशासनातर्फे न्हावा शेवा बंदरचे सहाय्यक पोलीस आयुक्त धनाजी क्षीरसागर,उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीपान शिंदे, गुन्हे विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण आदींनी मध्यस्थी करून या समस्येवर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला परंतु तो यशस्वी झाला नाही.आंदोलन स्थळी कोणतेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस अधिकारी कर्मचारी तैनात करण्यात आले होते.
















थोडे नवीन जरा जुने