महिला वर्गांनी श्रीफळ वाढवून विहिरिचे भूमिपूजन

काशिनाथ जाधव : प्रतिनिधी
पाताळगंगा : ४ मार्च , खालापूर तालुक्यातील पाण्यांची समस्या आजही गंभीर आहे.ज्या गावामध्ये नळ योजना असूनही पाण्यांची महिला वर्गांस मुबलक प्रमाणात पाणी मिळत नसल्यांचे महिला वर्गामधून नाराजीचा सुर उमठत आहे.मात्र ग्रूप ग्राम पंचायत माजगांव हद्दीतील असलेली आंबिवली येथे महिला वर्गांस मुबलक पाणी मिळावे.यासाठी पाताळगंगा नदि च्या ठिकाणी पौध येथे विहीर खोदलेल्या जागेचे भूमिपूजन महिला वर्गांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले.


              ग्रूप ग्राम पंचायत सरपंच गोपीनाथ जाधव यांच्या पुढाकारांने पाताळगंगा च्या नदिच्या किणारी पौध येथे विहीर खोदण्यात आली असून या माध्यमातून पाण्यांचा प्रश्न मार्गी लागणार आहे.आंबिवली गावामध्ये नळ योजना आहे.मात्र उन्हाळी मध्ये अनेक सरोवर तळ गाठत असतात.महिला वर्गांस खूप पाणी मिळावे या उद्दात विचारांतून नदिच्या ठिकाणी विहीर खोदण्यात आली.या नदिच्या पाझर असल्याने ही विहीर काही तासात भरत असल्यामुळे पाण्यांची टंचाई वर्षाचे बारा महिने भासणार नाही.


                 या विहीरीचे काम अंतिम टप्यात आले असून लवकरात लवकर महिला वर्गांस मुबलक पाणी मिळणार आहे.या विहीरीच्या भूमीपूजन सोहळ्यास ग्रूप ग्राम पंचायत माजगांव सरपंच गोपीनाथ जाधव,जनार्धन जाधव,माजी उप सरपंच जया जाधव,तसेच विहीरीचे ठेकेदार समवेत सी आर पी महिला बचत गट अध्यक्ष - कमल जाधव,


वर्षा जाधव,शारदा जाधव,मनिषा जाधव,उषा जाधव,अंजली जाधव,प्रियंका जाधव,दिपीका जाधव,अपर्णा जाधव,मोनिका जाधव,मीना पाटील,अस्मिता पाटील,सीमा पाटील,जयश्री पाटील,लता भोईर,पुष्पा ठोंबरे,सुवर्णा जाधव अदि अदि उपस्थित होत्या.

थोडे नवीन जरा जुने