गुगल पे हॅक करून केली दोन लाखाची फसवणूक

पनवेल दि. १८ ( वार्ताहर ) : एका इसमाच्या मोबाईल वर अज्ञात इसमाने फोन करून त्यानंतर त्याचे गुगल पे हॅक करून त्याच्या बँकेतील बचत खात्यातून २ लाख ९ हजार ९९९ /- रुपये काढून घेऊन त्याची फसवणूक केल्याची घटना तळोजा औद्योगिक वसाहती मध्ये घडली आहे .                  दत्तात्रय शेडगे हे तळोजा औद्योगिक वसाहती मधील कंपनीत कामावर असताना त्यांना एका अज्ञात इसमाने फोन करून त्यानंतर त्याचे गुगल पे हॅक करून त्याच्या बँकेतील बचत खात्यातून २ लाख ९ हजार ९९९ रुपये काढून घेऊन त्याची फसवणूक केल्याने याबाबतची तक्रार तळोजा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे .


थोडे नवीन जरा जुने