एटीएम मशीनमध्ये छेडछाड करून काढले दहा हजार रुपये

पनवेल दि.१८ (वार्ताहर) : कामोठे परिसरातील एटीएम मशीनमध्ये छेडछाड करून त्यामधून दहा हजार रुपयांचे रोख रक्कम काढून नेल्याप्रकरणी कामोठे पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


कामोठे सेक्टर ३६ येथील आंबे श्रद्धा सोसायटी येथे असणाऱ्या शरद सहकारी बँक लिमिटेड एटीएम सेंटरमध्ये एका अनोळखी इसमाने प्रवेश केला व आतमधील मशीनमध्ये चावीच्या सहाय्याने उघडून त्यामधून दहा हजार रुपयांचे रोख रक्कम काढून नेले. याप्रकरणी शरद सहकारी बॅंकचे शाखा व्यवस्थापक रोहिदास डुकरे यांनी कामोठे पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरोधात तक्रार दाखल केली आहे.


थोडे नवीन जरा जुने