छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवसेनेतर्फे राबवण्यात आले विविध उपक्रम







छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवसेनेतर्फे राबवण्यात आले विविध उपक्रम
पनवेल दि. ११ (संजय कदम) : छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या जयंती शिवसेना खान्दा कॉलनी विभागाच्या मार्फत विविध सामाजिक उपक्रम राबवत साजरी करण्यात आली.


 या उपक्रमाला शिवसेना पनवेल विधानसभा जिल्हा संपर्कप्रमुख रामदास शेवाळे यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती.      
माजी नगरसेवक शिवाजीराव थोरवे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना खान्दा कॉलनी विभागाच्या वतीने जेष्ठ नागरिक ओळखपत्र वाटप, झोपडपट्टीतील गरीब नागरिकांना धान्य वाटप, रेशनकार्ड वाटप, उत्पन्नाचे दाखले, विधवा महिलांच्या मुलांना शालेय वस्तू वाटप करण्यात आले. त्याचप्रमाणे शालेय आरटीई मुलांच्या शिक्षणाचे फॉर्म भरून देण्यात आली. या सर्व उपक्रमात नागरिकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला. यावेळी महादेव मुळीक, शंकरराव मुळीक, जगन्नाथ शिंदे, नामदेव मुळीक, श्रीयुत काळे, सुरेश पाटील यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते. 




थोडे नवीन जरा जुने