शिवशक्ती मित्र मंडळाने होळीकोत्सव केला धुमधडक्यात साजरा

पनवेल दि.११ (संजय कदम) : पनवेलच्या लाईन आळीतील शिवशक्ती मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष रमेश (दादा) गुडेकर यांच्या नेतृत्वाखाली शिवशक्ती मित्रमंडळाने होलीकोत्सव उत्सवात वेगवेगळ्या सामाजिक, क्रिडा, सांस्कृतिक कार्यक्रम उपक्रम राबवून धुमधडक्यात साजरा केला. 
शिवशक्ती मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष रमेश (दादा) गुडेकर यांच्या नेतृत्वाखाली शिवशक्ती मित्रमंडळाने यंदा होलीकोत्सव उत्सव निमित्त विविध सामाजिक, क्रिडा, सांस्कृतिक कार्यक्रम उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने विभागातील सर्व महिला एकत्र येउन मंडळातर्फे सामुदायिक महिलांनी केक कापून हा महिला दिन साजरा केला. तसेच महिलांसाठी पैठणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याचप्रमाणे होळी पुजन, बालवाडीच्या मुले-मुलांसाठी तसेच सर्व गटातील महिलांसाठी विविध क्रिडा स्पर्धांचे आयोजन, सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये वेशभूषा, सिंगल डान्स, ग्रुप डान्स यांचे आयोजन करण्यात आले होते. शिवजयंती उत्सवामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम व बक्षीस वितरण समारंभ आणि रात्री गायक गणेश भगत प्रस्तुत मराठी आणि हिंदी गितांचा सदाबहार कार्यक्रम पंचम निर्मित गंध सुरांचा कार्यक्रम ठेवण्यात आला. तसेच सत्यनारायणाची महापुजा आणि महाप्रसादाचे आयोजनही करण्यात आले होते


. मंडळाचे संस्थापक अध्यक्ष व मार्गदर्शक रमेश गुडेकर यांच्याबरोबर मंडळाचे अध्यक्ष निलेश समेळ, उपाध्यक्ष गौरव वेदक, कार्याध्यक्ष खंडेश धनावडे, समीर कदम, सहकार्याध्यक्ष नानू वाघे, प्रवीण पोवार, हिशोब तपासणीस अरुण ठाकूर, संयुक्त चिटणीस प्रशांत नरसाळे, खजिनदार संतोष तळेकर, सहखजिनदार अनिकेत जाधव यांच्यासह मंडळाच्या असंख्य कार्यकत्यांनी हे कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मेहनत घेतली.


कोट - शिवशक्ती मित्र मंडळाचे अध्यक्ष रमेश गुडेकर यांनी आपल्या सामाजिक जडणघडणीत सिंहाचा वाटा असलेल्या स्व. गोपाळ कदम, स्व. पार्वती चव्हाण, स्व. सुरेखा नरसाळे यांच्या स्मरणार्थ आजन्म ५१ हजार रूपये शिवशक्ती मित्र मंडळाला देण्याची घोषणा केली आहे. या घोषणेचे मंडळाच्या कार्यकत्यांनी स्वागत केले आहे.

थोडे नवीन जरा जुने