वयाळ येथिल पाण्यांचा प्रश्न मार्गी लागणार? नळ पाणीपुरवठा योजनेच्या कामाचा भूमिपूजन








काशिनाथ जाधव : प्रतिनिधी
पाताळगंगा : ११ मार्च, पाणी हे जिवन आहे.तालुक्याच्या ठिकाणी पाताळगंगा नदि वाहत असते.मात्र यांच पाण्यांचा उपयोग करून आपल्याला रोजच्या दैनंदिन जिवनात वापरु शकतो.वयाळ येथिल गावानजीक पाताळगंगा नदि वाहत असतांना जल जिवन मिशन अंतर्गत राष्ट्रवादि नेते सुरेश पाटील सुरेश पाटील यांच्या पुढाकारांने नळ पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून या ठिकाणी विहीरीच्या जागेचे भूमिपूजन करण्यात आले आहे.ह्या ठिकाणी विहीरसाठी खोदकाम केल्यास झ-या च्या माध्यमातून सातत्याने विहीरीला पाणी राहणार असेल या पाण्यांचा तुटवडा भासणार नाही.या उद्दात विचारांतून या जागेचे भूमिपूजन करण्यात आले.


             खालापूर तालुक्यातील अनेक गावात विहीरी आहेत काहीचे पाणी दुषित झाले आहे तर काही कोरड्या पडल्या आहेत. साधारण मात्र मार्च महिन्यात विहीर तळ गाठत असतात.यामुळे महिला वर्गांस पाणीच्या टंचाईला सामोरे जावे लागत असते.मात्र नदिच्या ठिकाणी विहीर खोदल्यास सातत्याने पाणी राहणार असून शिवाय महिला वर्गांची पाण्यासाठी सुरु असलेली वणवण थांबणार आहे.या सर्व बाबीचा आभ्यास करून जल जिवन मिशन अंत


र्गत नळ पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून या ठिकाणी या जागेचे भूमिपूजन करण्यात आले.
           या कार्यक्रमास राष्ट्रवादि नेते सुरेश पाटील यावेळी या कार्यक्रमास ग्रूप ग्राम पंचायत टेंभरी सरपंच रमेश गायकवाड, उपसरपंच दर्शना फाटे,ग्रामसेवक गोकुळदास राठोड,उद्योजक - विनोद शेठ भोईर,ग्रा.पं.सदस्य निखिल पाटील, रोशन गायकवाड, निलेश ठोंबरे, अपर्णा पवार, सपना ठोंबरे,ग्रामस्थ व युवक मंडळ उपस्थित होते.






थोडे नवीन जरा जुने