चिपले शाळेला संगणकाची भेट





पनवेल : रोटरी क्लब ऑफ न्यु पनवेल व इनरव्हिल क्लब न्यु पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने चिपले रा.जी.प. मराठी गॅलेक्सी विद्यामंदिरात सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त संगणकाची भेट देण्यात आली.



या कार्यक्रमास रोटरी क्लब न्यु पनवेल अध्यक्ष प्रदीप देवकर,
 मंजुश्री देवकर, विश्राम कांबे, राजीवन, अॅड. स्नेहल वाडकर,
पल्लवी धारगलकर, पुनीत कर्णिक, सुनीता गुजर, मेंढन, ज्येष्ठ पत्रकार माधव पाटील, ग्रामपंचायत सदस्य कृष्णकांत पाटील उपस्थित होते. मुख्याध्यापिका सुष्मा मोकल व आरती पंडीत यांनी प्रास्ताविक


करुन शाळेच्या शैक्षणिक क्षेत्राची माहिती दिली. कार्यक्रमाचे संयोजक धनंजय पाटील, अजय पाटील, अक्षय पाटील, केतन पाटील, रवी पाटील, समीर पाटील, नारायण पाटील, विश्वजीत पाटील यांनी पाहुण्यांचे शाल व पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. क्लबच्या महिला सदस्यांनी विद्यार्थ्यांना होळीनिमित्त पुरणपोळी देवून विद्यार्थ्यांचे तोंड गोड केले.



थोडे नवीन जरा जुने