इनरव्हील क्लब ऑफ पनवेलतर्फे जागतिक महिला दिन विविध उपक्रमांनी साजरा





पनवेल दि. ११ (संजय कदम) : इनरव्हील क्लब ऑफ पनवेलतर्फे जागतिक महिला दिन आरोग्य तपासणी शिबीर, माता पालक मेळावा, हळदीकुंकू समारंभ, शाळेतील शिपाई व आरोग्य केंद्रामधील महिलांचा सन्मान यासारख्या उपक्रमांनी साजरा करण्यात आला. 


जागतिक महिला दिन निमित्त इनरव्हील क्लब ऑफ पनवेल आणि रोटरी क्लब ऑफ पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी शहरातील पटवर्धन हॉस्पिटल मध्ये आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरामध्ये महिलांची मेमोग्राफी, पॅप स्मिअर, बोन डेन्सिटी, सीबीसी इएनटी ,ब्लडप्रेशर अशा अनेक चाचण्या करण्यात आल्या. तसेच इनरव्हील क्लब ऑफ पनवेल आणि रयत शिक्षण संस्थेच्या अ.प .भोईर विद्यालय व रघुनाथ शेट जीतेकर ज्युनिअर कॉलेज दापोली-पारगाव यांच्या संयुक्त विद्यमाने माता पालक मेळावा व हळदीकुंकू समारंभ आयोजन करण्यात आले होते.
 यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्त्या अर्चना परेश ठाकूर, इनरव्हील क्लब ऑफ पनवेल च्या अध्यक्षा संजीवनी मालवणकर, जिल्हा विस्तार सेवा संयोजक डॉ. शोभना पालेकर, सरपंच सौ प्रशांती प्रकाश डाउर, संगीता प्रकाश जितेकर, शाळेच्या प्राचार्य पुष्पलता ठाकूर यांच्यासह महिला वर्ग उपस्थित होते. यावेळी मनशक्ती केंद्राच्या छाया शेळके यांनी उपस्थित महिलांना पालकत्व याविषयावर मार्गदर्शन केले. तसेच इनरव्हील क्लब ऑफ पनवेलच्या सदस्य ऍड. सुजाता चव्हाण यांनी महिलांचे अधिकार यावर माहिती दिली. शाळेच्या विद्यार्थिनींनी महिलांवर होणाऱ्या अत्याचार आणि त्यांचा प्रतिकार कसा करावा यावर नृत्य सादर केले. 


या कार्यक्रमावेळी अलका वैशंपायन ,रुबीना बोरकर ,श्रेया सहस्रबुद्धे यांचे पुस्तक प्रदर्शित झाल्याबद्दल त्यांचा प्रमुख पाहुण्यांतर्फे सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे समाजसेविका रेश्मा सुनील कुरूप यांना नुकताच दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे यानिमित्ताने त्यांचाही सन्मान करण्यात आला. तसेच रयत शिक्षण संस्थेतील शाळेतील शिपाई व आरोग्य केंद्रामधील महिलांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शाळेच्या पर्यवेक्षिका के एन अतीतकर, उपमुख्याध्यापिका डी डी भरणूके, क्लबच्या ज्येष्ठ सदस्य शैलजा खाडीलकर, प्रभा सहस्त्रबुद्धे, सुलभा निंबाळकर, संयोगिता बापट, जॉइंट सेक्रेटरी विनया सहस्रबुद्धे, आयएसओ वंदना लगाटे, एडिटर डॉ. वीणा मनोहर, शाळेच्या सर्व शिक्षिका आणि इनरव्हील क्लबचे सदस्य उपस्थित होते. 





थोडे नवीन जरा जुने