ज्येष्ठ नागरिकांसाठी अभिनव शाळा
पनवेल दि. १२ (वार्ताहर) : नवीन पनवेलच्या डॉ. नंदकुमार मारूती जाधव फाऊंडेशनतर्फे ज्येष्ठ नागरिकांची अभिनव शाळा लवकरच सुरू होत आहे. ही शाळा अनिवासी असणार आहे.


या शाळेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना शाळेची वेळ सकाळची असून त्यांना बसची सुविधा उपलब्ध असेल, आवश्यकतेनुसार नाश्ता व दुपारच्या जेवणाची सोय, शाळेच्या वेळेत ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी पूर्णवेळ नर्स आणि आवश्यकतेनुसार डॉक्टरची सुविधा, सुसज्ज ग्रंथालय, खेळाची व करमणुकीची साधणे, उत्तम बेड व बैठकीची व्यवस्था, योग व प्राणायम शिक्षणाची सुविधा, सुप्त कला गुणांना संधी, अनुभवी व तज्ञ मार्गदर्शक,


 अल्प देखभाल शुल्क तसेच कौटुंबिक अडचणीवेळी अथवा कौटुंबिक आवश्यकेनुसार ज्येष्ठ नागरिकांच्या तात्पुरत्या वसतीगृहाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल. अधिक माहितीसाठी व नाव नोंदणीसाठी मो. 8657003445 या मोबाईलवर संपर्क साधावा असे आवाहन डॉ. नंदकुमार मारूती जाधव फाऊंडेशनतर्फे करण्यात आले आहे.थोडे नवीन जरा जुने