अल्पवयीन मुलीला फूस लावून नेले पळवून

पनवेल दि.२४ (वार्ताहर) : पनवेल तालुक्यातील किरवली येथून अज्ञात इसमाने एका अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी तळोजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.             या अल्पवयीन मुलीचे वय 15 वर्षे असून अंगाने मध्यम, रंग गोरा, चेहरा उभट, उंची अंदाजे 5 फुट, केस काळे वाढलेले, डोळे काळे, ओठांचे खाली मसा, अंगात हिरव्या रंगाचा अंबरेला घातलेला आहे. सदर मुलीबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास तळोजा पोलीस ठाणे किंवा पोउपनि बळीराम घंटे (मो.7972134163) यांच्याशी संपर्क साधावा.थोडे नवीन जरा जुने