रेल्वेच्या धडकेत इसम ठार





पनवेल दि.२४ (संजय कदम) : जेएनपीटी ते पनवेल रेल्वेमार्गादरम्यान रेल्वेची धडक लागून एक अनोळखी इसमाचा मृत्यू झाला आहे. या घटनेची नोंद पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. 




 जे. एन. पी. टी. ते पनवेल रेल्वे रूळावर पोल नंबर ७५ / ३२ जवळ अंदाजे २५ ते ३० वर्षे वयोगटाचा अनोळखी इसम रेल्वेच्या धडकेत मयत झाला आहे. या घटनेची नोंद पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून अधिक तपास सपोनिरी वृषाली पवार करीत आहेत.


थोडे नवीन जरा जुने