तीन वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार करणाऱ्या नराधमास अवघ्या काही तासात रेल्वे पोलिसांनी घेतले ताब्यातपनवेल दि.०२ (संजय कदम) : पनवेल रेल्वे स्थानकाच्या परिसरात एका तीन वर्षीय मुलीवर बलात्काराची घटना आज सकाळी घडल्याचे उघडकीस आले होते. याप्रकरणी पनवेल रेल्वे पोलिसांनी तात्काळ कारवाई करत सीसीटीव्ही फुटेज द्वारे तपासणी करून अवघ्या काही तासात नराधमाला ताब्यात घेतले आहे.
  पनवेल रेल्वे स्टेशन फलाटावरील बाकडयाजवळ आई आपल्या चिमुकलीसह झोपली होती. दरम्यान फिर्यादी आई ह्या लघुशंका करण्यासाठी गेल्या असताना अज्ञाताने त्यांची तीन वर्षाची चिमुकलीला उचलून नेले. सदर मुलीचा शोध घेतला असता ती जवळील सिमेंट रिलपरचे बाजूला निर्वस्त्र व बेशुध्द अवस्थेत मिळून आल्याने तिला तात्काळ स्थानिक रेल्वे पोलिसांच्या मदतीने उपजिल्हा रुग्णालय येथे दाखल करण्यात आले. पनवेल रेल्वे पोलिसांनी या गंभीर घटनेची दखल घेऊन लोहमार्ग पोलीस गुन्हे अति कार्यभार सहायक पोलीस आयुक्त व वाचक शाखा पोलीस निरीक्षक सचिन कदम, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रविण पाडवी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेख, पोलीस निरीक्षक प्रकाश होवाळ, पोउपनि बदाले, सपोफौ कदम, सपोफौ यादव, पोहवा खाडे, पोहया जाधव, पोहवा चव्हाण, पोहवा पाटील, मपोहवा बोराटे, पोना केमसे, पोना देशमुख, पोना माने, पोशि मल्लाव, पोशि तेली, पोशि हांडे, पोरि फुंदे, पोशि घोलप, पोशि शिंदे, पोशि कदम, पोशि साळुंखे, पोशि सोनवणे आदींच्या पथकाची टीम तयार करुन त्यांना आरोपीचा शोध घेणेबाबत मार्गदर्शन करून रवाना करण्यात आले. सदर गुन्ह्याचे तपासाचे अनुषंगाने तांत्रिक विश्लेषण तसेच गुप्त बातमीदार यांचेकडून आरोपी हा बाटल्या गोळा करणारा इसम असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तपासा दरम्यान रेल्वे सुरक्षा बल जवान आनंदकुमार यांना जुईनगर रेल्वे स्टेशन येथे फलाटावर गस्त करीत असताना आरोपी मुकेशकुमार बाबु खाँ साह (वय 30) हा दिसून आल्याने त्यास ताब्यात घेवून त्याचेकडे यागुन्ह्याचे अनुषंगाने विश्वासात घेवून कसून विचारपूस केली असता त्याने सदर गुन्हा केल्याची कबुली दिली. तसेच तांत्रिक विश्लेषणावरुन सदर गुन्हा त्यानेच केला असल्याचे निष्पन्न झाल्याने आरोपीची अटकपूर्व वैद्यकिय तपासणी करून त्याला तात्काळ अटक करण्यात आली. 
थोडे नवीन जरा जुने