चवदारतळे येथे होणाऱ्या क्रांती दिनासाठी स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पार्टीचे रायगड जिल्हा अध्यक्ष महेश साळुंखे यांच्यामार्फत जय्यत तयारी सुरु

पनवेल दि.१६ (संजय कदम) : महाड चवदार तळे येथे होणाऱ्या क्रांती दिनासाठी स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पार्टीचे रायगड जिल्हा अध्यक्ष महेश साळुंखे यांच्यामार्फत जय्यत तयारी सुरु करण्यात आली आहे. यासाठी पनवेल तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यातील गावोगावी बैठका घेऊन कार्यकर्त्यांना सभेला उपस्थित राहण्यासाठी आवाहन करत आहेत.स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष मनोज संसारे आणि एकतावादी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नानासाहेब ईंदीसे हे आगामी चवदार तळे महाड येथे होणाऱ्या क्रांती दिना साठी १९ मार्च रोजी महाड येथे हजर राहणार आहेत. या ठिकाणी दरवर्षी लाखो भीमसैनिक दर्शनासाठी येत असतात. या दोन्ही पक्षांची संयुक्त सभा याठिकाणी होणार आहे
. या सभेची संपूर्ण जबाबदारी स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पार्टीचे रायगड जिल्हा अध्यक्ष महेश साळुंखे व रायगड जिल्हा सरचिटणीस विजय धोत्रे यांच्या खांद्यावर आहे. त्यानुसार महेश साळुंखे हे पनवेल तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यातील गावोगावी बैठका घेऊन कार्यकर्त्यांना सभेला उपस्थित राहण्यासाठी आवाहन करत आहेत.थोडे नवीन जरा जुने