राहत्या घरातून महिला बेपत्ता

पनवेल दि.१६ (वार्ताहर) : कळंबोली येथील राहत्या घरातून महिला बेपत्ता झाल्याने ती हरवल्याची तक्रार कळंबोली पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.  मालाबाई संतोष चव्हाण असे या बेपत्ता महिलेचे नाव आहे. तिचे वय ३७ वर्षे असून तिची उंची ५ फुट ४ इंच, रंग गोरा, नाक सरळ, अंगाने मध्यम, केस काळे तसेच अंगात लाल रंगाची साडी व निळया रंगाचा ब्लाउज घातलेला आहे. या महिलेला मराठी, हिंदी भाषा बोलता येते. या महिलेबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास कळंबोली पोलीस ठाणे (०२२-२७४२३०००) किंवा पोलीस हवालदार जे पी पाटील यांच्याशी संपर्क साधावा. थोडे नवीन जरा जुने