खारघरमध्ये एनसीबीची कारवाई; एका आरोपीला अटक




पनवेल दि.१६ (वार्ताहर) : अमलीपदार्थ नियंत्रण विभागाच्या (एनसीबी) मुंबई पथकाने खारघर व शिळफाटा येथे कारवाई करून सव्वा किलो चरससह एका आरोपीला अटक केली.

 
अमलीपदार्थ नियंत्रण विभागाच्या पथकाला मुंबईत अमलीपदार्थ विक्रीप्रकरणी तपास करीत असताना खारघर येथील रहिवासी एम. खान चरस विक्रीत सक्रिय असल्याची आणि तो मुंबईत अमलीपदार्थ घेऊन येणार असल्याची माहिती मिळाली. आरोपीने अमलीपदार्थ आणून कल्याण शिळफाटा येथील दुकानात लपवल्याची माहिती मिळताच एनसीबीने खानच्या दोन दुकानांसह गोदामाची झडती घेतली. तेथून एक किलो १०० ग्रॅम चरस आणि रोख सात लाख रुपये जप्त करण्यात आले. त्यानंतर खानला खारघर येथून ताब्यात घेण्यात आले.


थोडे नवीन जरा जुने