पनवेल दि. २० ( वार्ताहर ) : कोकण शिक्षक मतदार संघाचे माजी आमदार बाळाराम पाटील हे शिक्षकांच्या विविध मागण्यांसाठी नेहमीच संघर्षाने, आंदोलनाने सरकारचे लक्ष वेधतात. त्यामुळे शिक्षकांच्या न्याय हक्कासाठी लढणार नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. बाळाराम पाटील सध्या चर्चेत असण्याच कारण म्हणजे, बाळाराम पाटील यांनी त्यांच्या आमदार निधीतून रायगड जिल्यातील 309 शाळांना प्रिंटर वाटप सुरु केले आहे. विशेष म्हणजे विद्यमान आमदार नसताना सुद्धा शिक्षण क्षेत्रातील विकासासाठी व शिक्षक हिताकरिता सदैव तत्पर असल्याची भूमिका घेत, त्यांनी केलेल्या वचनाची पूर्तता म्हणूनच त्यांनी शाळांना प्रिंटर वाटपाचा उपक्रम हाती घेतला आहे.
बाळाराम पाटील यांनी विविध प्रकारच्या आंदोलना द्वारे शिक्षकांच्या मागण्यासाठी शासनाचे लक्ष वेधून घेतले अशावेळी शासनाला देखील दखल घ्यावी लागली. शिक्षक आमदार असताना सुद्धा पाच जिल्हासाठी निधी तुटपुंजा भासत असल्यामुळे त्यांनी अन्य राज्यसभा खासदार व विधानपरिषद आमदारांचा निधी मिळवून प्रत्येक शाळांना संगणक संच, प्रिंटर, प्रयोगशाळा साहित्य वेळोवेळी उपलब्ध करून दिले तसेच यापुढेही होणार आहे असल्याचा निर्धार त्यांनी केला आहे.
Tags
पनवेल