मूट कोर्ट कॉम्पिटिशन आणि क्लाइन्ट कौन्सिलिंग कॉम्पेटिशनला चांगला प्रतिसाद, न्यायाधीशांच्या हस्ते पारितोषिकांचे वितरण

पनवेल दि. २० ( वार्ताहर ) : केएलई कॉलेज ऑफ लॉ, कळंबोली येथे 16 ते 19 मार्च दरम्यान स्पार्कल 4.0 नॅशनल मूट कोर्ट कॉम्पिटिशन आणि क्लाइन्ट कौन्सिलिंग कॉम्पेटिशनचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमादरम्यान सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश अभय ओक, मुंबई हायकोर्टाचे न्यायाधीश कलापती श्रीराम, न्यायाधीश राजेश पाटील, हायकोर्ट कर्नाटकाचे न्यायाधीश विजय कुमार पाटील, केलई सोसायटीचे चेअरमन प्रभाकर कोरे, कॉलेजचे प्रिन्सिपल दिनकर गीते यांच्यासह अनेक जण उपस्थित होते.                      नॅशनल मूट कोर्ट कॉम्पिटिशन आणि क्लाइन्ट कौन्सिलिंग कॉम्पेटिशनसाठी संपूर्ण भारतातून ९ राज्यातून ६० टीम सहभागी झाल्या होत्या. मूट कोर्ट कॉम्पिटिशनमध्ये रिझवी लॉ कॉलेज, मुंबई यांना प्रथम क्रमांक तर क्राईस लवासा लॉ स्कूल यांनी दुसरा क्रमांक पटकावला. क्लाइंट कौन्सिलिंग कॉम्पिटिशनमध्ये लॉ कॉलेज, मुंबई यांनी पहिला क्रमांक तर क्यू एल सी युनिव्हर्सिटी पंजाब लॉ कॉलेजने दुसरा क्रमांक पटकावला. त्यांना न्यायाधिशांच्या हस्ते पारितोषिके देऊन गौरवण्यात आले. मूट कोर्ट कॉम्पिटिशन आणि क्लाइंट कौन्सिलिंग कॉम्पिटिशनला मोठा प्रतिसाद मिळाला. यावेळी न्यायाधीश अभय ओक यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना विद्यार्थी कसे ग्रो होऊ शकतात, न्यायाधीशांसमोर कसे उभे राहायचे, विषयाची मांडणी कशी करायची, कोर्टात उभे राहून कसं बोलायचं याबाबतचे मार्गदर्शन केले. यावेळी संस्थेचे प्रभाकर कोरे यांनी केएलई कॉलेज ही 105 वर्षे जुनी संस्था असल्याचे सांगून संस्थेचे एकूण 290 कॉलेज असल्याचे सांगितले. व या शिक्षण संस्थेतून अनेक विद्यार्थी घडत असल्याचे सांगून विद्यार्थ्यांनी महापुरुषांचा आदर्श घ्यावा असे भाषणात नमूद केले.थोडे नवीन जरा जुने