कामगारांच्या हक्कांसाठी, डोणवत येथे शिव जनरल कामगार सेनेच्या नामफलकाचे अनावरणकाशिनाथ जाधव : प्रतिनिधी
पाताळगंगा : ३ मार्च,डोणवत या परिसरात अनेक कारखाने असून येथिल स्थानिक कामगारांना त्यांच्या हक्काची युनियन करता यावी शिवाय समान वेतन समान काम या हे धोरण कारखान्यातील व्यवस्थापक यांनी त्यांचा अवलंब करावा.त्यांची पिळवणूक होता कामे नये शिवाय स्थानिकांना काम मिळावे त्यांच्या नोकरीवर गदा येवू नये या विचारांतून संगम जाधव यांच्या डोणवत येथील जनसंपर्क कार्यालय येथे शिव जनरल कामगार सेनेच्या नाम फलकाचे अनावरण करण्यात आले.                  या नाम फलकांचे अनावरण अध्यक्ष - सुशील कारखानीस व सरचिटणीस घनश्याम नाईक यांच्या हस्ते शिव जनरल कामगार या युनियन नाम फलकांचे फित कापून अनावरण करण्यात आले.यावेळी तालुका अध्यक्षपदी संगम जाधव यांची नियुक्ती करण्यात आली. त्या आशयाचे नियुक्तीपत्र देण्यात आल्याने त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. शिव जनरल कामगार सेनेच्या माध्यमातून कामगारांचे प्रश्न सोडवून त्यांना योग्य तो न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला जाईल.असे मत उपस्थित पदाधिकारी यांनी व्यक्त केले. 


              या नाम फलकांचे आनावरण करण्यासाठी शिव जनरल कामगार सेना अध्यक्ष सुशील कारखानीस, सरचिटणीस घनश्याम नाईक, रायगड जिल्हाध्यक्ष अतुल दिघे, खालापूर तालुकाध्यक्ष संगम जाधव, युवासेना तालुका अधिकारी महेश पाटील, अशोक मरागजे, अनिल सानप, शैला भगत, वैजयंता गायकवाड, विशाल म्हामूणकर, पंकज जाधव, योगेश बैलमारे, शेखर धोत्रे, नासिर पठाण, अनिल म्हामूणकर, अर्जुन देशमुख, वासुदेव धामणसे आदीप्रमुख मान्यवर उपस्थितीत होते.     

 चौकट : खालापूर तालुक्यात मोठी औद्योगिक वसाहत आहे.शिव जनरल कामगार सेना कामगारांसाठी काम करणार असुन या माध्यमातून कामगार वर्गाला योग्य न्याय दिला जाईल. एखाद्या कारखान्यात युनियनची स्थापना करीत असताना कंपनी कशी सुरळीत चालेल आणि कामगारांच्या मागण्या पूर्ण कशा होईल यावर प्रामुख्याने प्राधान्य दिले जाईल, यात कोणतेही राजकारण होणार नाही.( सरचिटणीस घनश्याम नाईक )थोडे नवीन जरा जुने