अल्पवयीन मुलगी बेपत्ता

पनवेल दि.०८ (वार्ताहर) : तळोजा पोलीस ठाणे हद्दितीतील शिर्के लेबर कॅम्प येथून एक १४ वर्षीय अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्याची घटना घडली आहे. 

 
रीतुकुमारी हरेंद्र महतो असे या मुलीचे नाव असून वय 14 वर्ष, रंग गव्हाळ, चेहरा उभट, केस काळे, मध्यम बांधा, उंची 4 फुट 5 इंच इतकी आहे. तिने अंगात लाल रंगाचा कुर्ता व काळ्या रंगाची सलवार घातलेली आहे. या मुलीला हिंदी व भोजपुरी भाषा बोलता येत असून सदर मुलीबाबत कोणाला काही अधिक माहिती असल्यास तळोजा पोलीस स्टेशन किंवा सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गुरव (मो.9403442042) यांच्याशी संपर्क साधावा.थोडे नवीन जरा जुने