मराठी चेंबर ऑफ कॉमर्स आयोजित महिला मेगा मेळावा उत्साहात पडला पार





पनवेल दि.०८ (संजय कदम) : मराठी चेंबर ऑफ कॉमर्स आयोजित ‘महिला मेगा मेळावा’ छत्रपती शिवाजी मंदिर नाट्यगृह दादर पश्चिम येथे उत्साहात पार पडला. या कार्यक्रमामध्ये ऑटोमोबाईल क्षेत्रामधील कामगिरीसाठी अपर्णा शिंदे-शहा यांचा मराठी चेंबर ऑफ कॉमर्सतर्फे सन्मान करण्यात आला.


आपापल्या क्षेत्रातल्या कामगिरी बद्दल गप्पा गोष्टी, सरकारी व विविध योजनांची माहिती तसेच महिलांपुढे उद्योग एक संधी आणि महिला उद्योगधिकांच्या भूमिका यासाठी ‘महिला मेगा मेळावा’ या परिसंवादाचे आयोजन मराठी चेंबर ऑफ कॉमर्सच्या वतीने करण्यात आले होते. या कार्यक्रमाला महिला व बालकल्याण आयुक्त आर विमला, भावना मोटर्सच्या अपर्णा शिंदे-शहा, झेप उद्योगिनी संस्थेच्या संचालिका पूर्णिमा शिरीष, डिक्की संस्थेच्या महाराष्ट्र अध्यक्ष चित्रा उबाळे, मीती क्रिएशन्सच्या उत्तरा मोने, अनुया देशमुख आणि मंजुषा पैठणकर यांच्यासह महिला उद्योजकांसह मोठ्या संख्येने महिला वर्ग उपस्थित होता


. यावेळी ज्योवीस वेलनेसच्या डॉ. ज्योती सातपुते, एस ए इनामदार रेडिमेड ब्लाऊजच्या श्वेता इनामदार यांचा विशेष सत्कार करण्यात आले. यावेळी भावना मोटर्सच्या अपर्णा शहा यांनी ऑटोमोबाईल या क्षेत्रामध्ये महिलांना काय काय संधी आहे आणि त्या संधीचा तुम्ही कसं सोनं करू शकता याचे उदाहरण देऊन महिलांशी संवाद साधला. या कार्यक्रमाची प्रस्तावना मराठी चेंबरच्या महिला समिती प्रमुख सोनल खानोलकर यांनी मांडली तर सहकार्यवाह अनघा बेडेकर यांनी मान्यवरांचे आभार मानले.




थोडे नवीन जरा जुने