पनवेलमध्ये धरणात दोघे बुडाले
पनवेल 
तालुक्यातील
देवळोली येथील उसराई धरणावर धुलिवंदननिमित्त मौजमजा करीत पोहण्यासाठी आलेले दोन तरुण बुडाल्याची घटना मंगळवारी  
 घडली. त्यामुळे धुलिवंदनला गालबोट लागल्याचे दिसून आले.


बुडालेले तरुण वेगवेगळ्या ग्रुपमधील असून उसराई धरणावर मौजमजा करून पोहण्यासाठी उतरल्याचे समजते. त्यांची नावे समजू शकली नाहीत. यापैकी एकाचा मृतदेह स्थानिकांच्या मदतीमुळे सापडला.तो कल्याणचा रहिवासी होता, तर दुसऱ्याचा मृतदेह सायंकाळी उशिरापर्यंत न सापडल्याने अग्निशमन दलाच्या जवानांनी शोधमोहीम तूर्त थांबविली.घटनास्थळी पनवेल पोलीस, अग्निशमन दलाचे जवान, अपघातग्रस्त टीमचे सदस्य हजर होते. या घटनेबाबत पोलीस पुढील कार्यवाही करीत आहेत.


थोडे नवीन जरा जुने