शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे नविन पनवेल शहराच्या वतीने महिलांसाठी ‘होममिनिस्टर’ चे आयोजनपनवेल दि.०८ (संजय कदम) : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती (तिथीप्रमाणे) व जागतिक महिलादिनानिमित्त शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नविन पनवेल शहराच्या वतीने महिलांसाठी १० मार्च रोजी हळदीकुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त महिलांसाठी खास ‘होममिनिस्टर’ कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे.


या कार्यक्रमामध्ये महिलांना हसत खेळत आपल्यातल्या कलागुण कौशल्याला वाव मिळावा यासाठी शुक्रवार दि.१० मार्च रोजी संध्याकाळी ५ वाजता नवीन पनवेल सेक्टर २ येथील अंबे माता मंदिरा शेजारील मैदानात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये महिलांना भरघोस बक्षिसे सोबत लकी ड्रॉ मध्ये पैठणी जिंकण्याची सुवर्ण संधी मिळणार आहे. यामध्ये पहिले पारितोषिक सोन्याची नथ, दुसरे पारितोषिक एल.सी.डी. टिव्ही तर तिसरे पारितोषिक कूलर भेट म्हणून मिळणार आहे. तसेच कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या प्रत्येक महिलेस एक आकर्षक बक्षिस देण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितिन घाणेकर करणार आहेत. तरी मोठ्या संख्येने महिलांनी यामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नविन पनवेल शहरप्रमुख यतिन देशमुख व महिला शहर संघटक अपूर्वा प्रभू यांनी केले आहे.


थोडे नवीन जरा जुने