उभ्या शिवशाही बसला इर्टिका कारची धडक; एक ठार तीन जखमी

पनवेल दि.०८ (वार्ताहर) : मुंबई गोवा महामार्गावर पनवेल जवळील चिंचवण गावाच्या परिसरात आज सकाळी उभ्या शिवशाही बसला पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या इर्टिका कारची धडक बसून झालेल्या अपघातात गाडीतील १ ठार तर तीन जखमी झाल्याची घटना घडली आहे. 

 
 ठाणे येथील इव्हेंट मॅनॅजमेण्ट करणारे सुप्रसिद्ध निवेदक दीपेश मोरे हे आपल्या सहकाऱ्यांसह महाड येथील कार्यक्रम आटपून आज सकाळी ते ठाणे बाजूकडे त्यांच्या ताब्यातील इर्टिका गाडी क्र एमएच ०४ जीएम २४९५ हि घेऊन चालले असताना चिंचवण गावाच्या हद्दीत शिवशाही बसचा टायर पंक्चर झाल्याने ती रस्त्यावर उभी होती. 


सदर गाडीचा अंदाज न आल्याने इर्टिका गाडीवरील चालकाने शिवशाही बसला पाठीमागून धडक दिली. या धडकेत गाडीमधील दीपेश मोरे हे गंभीररीत्या जखमी होऊन मयत झाले आहेत तर त्यांच्यासोबत असलेले त्यांचे सहकारी रश्मी खावणेकर या जखमी झाल्याने त्यांना लाईफलाईन रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.


 त्याचप्रमाणे श्रद्धा जाधव व कोमल माने ह्या किरकोळ जखमी झाले आहेत. या अपघाताची नोंद पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.  थोडे नवीन जरा जुने