पनवेल दि.०८ (संजय कदम) : पनवेल तालुका विधि सेवा समिती आणि पनवेल वकील संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
हा कार्यक्रम न्यायाधीश श्रीमती ए. ए. गोडसे यांच्या अध्यक्षतेखाली तर न्यायाधीश श्रीमती एस. आर. पाटील व न्यायाधीश श्रीमती एस. एस. मुजावर यांच्या प्रमुख उपस्थित संपन्न झाला.
या कार्यक्रमाकरीता मानसशास्त्रज्ञ चित्रलेखा पाटकर उपस्थित होत्या. यावेळी त्यांनी भावनिक कल्याण, निरोगी व्यावसायिक आणि वैयक्तिक जीवनाची गुरुकिल्ली या विषयावर उपस्थित महिलांना मोलाचं मार्गदर्शन केले.
यावेळी पनवेल वकील संघटनेतील आजी व माजी महिला पदाधिकारी, न्यायालयातील महिला कर्मचारी आणि महिला वकिल मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Tags
पनवेल