कुडावे गावात रिक्षा व मोटरसायकलला अज्ञाताने लावली आग


पनवेल / प्रतिनिधी
पनवेल तालुक्यातील कुडावे गावात रिक्षा आणि मोटरसायकलला अज्ञात इसमाने आग लावून नुकसान केले याप्रकरणी पनवेल शहर पोलीस अधिक तपास करत आहेत.      चंद्रकांत कोंडिलकर यांनी त्यांचे ऑटोरिक्षा चुलत मामाच्या घराजवळ पार्क करून ठेवली होती. त्यानंतर ते झोपी गेले. पहाटे चारच्या सुमारास त्यांच्या पत्नीला जाग आली, तेव्हा तिला घराच्या खिडकीतून उजेड दिसला. त्यांनी घराची खिडकी उघडून पाहिली असता दुचाकीना आग लावण्यात आली होती. 


कुडावे येथील सुदर्शन कोंडीलकर याची मोटरसायकल क्रमांक एमएच 46 बीजे 5950, विराज कोंडीलकर याची जुपिटर मोटरसायकल क्रमांक एमएच 43 बी झेड 4571 व चंद्रकांत परशुराम कोंडीलकर यांची ऑटो रिक्षा क्रमांक एमएच 46 एसी 1586 या वाहनांना अज्ञात इसमाने आग लावली. यात वाहन, त्यातील कागदपत्रे व रोख रक्कम जाळून नुकसान केल्याप्रकरणी अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


थोडे नवीन जरा जुने