टी.एन.एम. पब्लिक स्कूल आसरोटी येथे चित्रकला व तृणधान्य पासून रांगोळी स्पर्धा



 



काशिनाथ जाधव : प्रतिनिधी
पाताळगंगा : ९ मार्च, आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य दिनांचे औचित्य साधून  टी.एन.एम. पब्लिक स्कूल  आसरोटी येथे विद्यार्थ्यांना पौष्टिक तृणधान्य महत्त्व सांगून साजरा करण्यात आला.




जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रायगड बानखिले ,यांच्या मार्गदर्शनाखाली हे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून साजरे केले जात असून जिल्ह्यातील सर्व तालुक्यात पौष्टिक तृणधान्याची लागवड ते प्रक्रिया याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.यावेळी विद्यार्थ्यांनी धान्यापासून रांगोळी स्पर्धेचे निंबध तसेच चित्रकला स्पर्धा आयोजन करण्यात आले.



                 या कार्यक्रमास खालापूर तालुका कृषी अधिकारी अर्चना सुळ यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना म्हणाले की.आपल्या आहारात फास्ट फूड जंक फूड यांचा आहारातील प्रमाण कमी करून तृणधान्यांचा वापर केल्यास पचन संस्था सुधारून यापासून शरीराला कॅल्शियम , पोटॅश, मॅग्नेशियम बी कॉम्प्लेक्स , यांसारखे पोषण तत्वे मिळतात तसेच रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होण्यास मदत होते त्यामुळे तृणधान्याचा आहारातील वापर वाढवणेचे आवाहन व मार्गदर्शन विद्यार्थ्यांना करण्यात आले.



             यावेळी टी .एन. एम. पब्लिक स्कूल चेअरमन  संतोष मुंढे उपाध्यक्ष सुभाष मुंढे ,ग्रुप ग्रामपंचायत टेंभरी -  उपसरपंच दर्शना फाटे  सदस्य  सपना ठोंबरे, निलेश ठोंबरे, योगेश फाटे, मंडळ कृषी अधिकारी देशमुख ,कृषी प. चौक - महाडिक , कृषी सहा.चौक शिवाजी राठोड , चित्रा सारंग ,शिंदे मॅडम , फराटे इत्यादी उपस्थित होते.


रांगोळी स्पर्धा व चित्रकला स्पर्धा मधून प्रथम तीन क्रमांकाची निवड करून विद्यार्थ्यांना सन्मापत्र व भेटवस्तू देऊन विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी टी. एन .एम. पब्लिक स्कूलचे प्राचार्य म्हात्रे मॅडम, संस्थेचे चेअरमन तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष मेहनत घेवून हा कार्यक्रम यशस्वी करण्यात आला.



 

थोडे नवीन जरा जुने