आईने मुलीला किडनी देऊन दिला पुनर्जन्म


आईने मुलीला किडनी देऊन दिला पुनर्जन्म ; खारघरच्या मेडीकव्हर हॉस्पिटलमध्ये ३० वर्षांच्या तरुणीवर यशस्वी किडनी प्रत्यारोपण - एबीओ विसंगत किडनी प्रत्यारोपणास डॅाक्टरांना यश
पनवेल दि.०९ (संजय कदम): भारतात दरवर्षी सुमारे 1.8 लाख लोकांचे मूत्रपिंड निकामी होतात. मात्र मुत्र प्रत्यारोपणाची संख्या केवळ 6,000 आहे (2015-16 साली केलेल्या दशलक्ष मृत्यूंच्या अभ्यासातून आलेल्या अहवालातून ). जागतिक किडनी दिनानिमित्त खारघरच्या मेडीकव्हर हॉस्पीटल्समध्ये एका ३० वर्षीय तरुणीवर यशस्वी किडनी प्रत्यारोपण करण्यात आले. या प्रकरणात आईने आपल्या मुलीला किडनी देऊन पुनर्जन्म दिला. हे प्रत्यारोपण डॅाक्टरांसाठी तितकेच आव्हानात्मक ठरले कारण मुलीला सुरुवातीला क्षयरोगाचे निदान झाले, दाता आणि प्राप्तकर्त्याचे विसंगत रक्त गट आणि प्राप्तकर्त्याकडे तिच्या आईच्या मूत्रपिंडाविरूद्ध अँटीबॉडीज होत्या अशी तिहेरी आव्हानांना सामोरे जात अखेर या रुग्णावर यशस्वीरित्या किडनी प्रत्यारोपण करण्यात आले.               या प्रकरणात आईचा रक्तगट बी पॅाझिटिव्ह होता, तर मुलीचा रक्तगट ए पॅाझिटिव्ह होता. नवी मुंबईतील वाशी येथे राहणारी नेहा सिंग हिला ऑगस्ट २०२१ मध्ये शेवटच्या टप्प्यात सीकेडी (क्रोनिक किडनी डिसीज) आढळून आला. ती डायलिसिसचे उपचार घेत होती परंतु तिला वारंवार ताप येऊ लागला. जेव्हा तिने मेडिकोव्हर हॉस्पिटलमधील डॉक्टरांचा सल्ला घेतला तेव्हा तपासणीअंती तिला क्षयरोगाचे निदान झाले आणि त्यामुळे तिला वारंवार ताप येत होता. रुग्णाला क्षयरोगाचे निदान झाले होते, ज्यामुळे तिचे मूत्रपिंड प्रत्यारोपण पुढे ढकलावे लागले कारण त्यामुळे संसर्ग पसरण्याचा धोका अधिक होता. तिला क्षयरोगाची औषधे दिली गेली आणि तिचा एक वर्षाचा उपचाराचा कोर्स पूर्ण करण्यात आला. किडनी प्रत्यारोपणासाठी तिच्या आईने पुढे येऊन अवयव दान केले अशी माहिती डॉ अमित लंगोटे, नेफ्रोलॉजिस्ट आणि किडनी ट्रान्सप्लांट स्पेशलिस्ट, मेडिकव्हर हॉस्पिटल, नवी मुंबई यांनी दिली. क्षयरोगाच्या व्यक्तीला वेगळ्या रक्तगटाच्या दात्याकडून किडनी घेण्यासाठी तयार करणे आणि दात्याच्या मूत्रपिंडाविरुद्ध तिच्याकडे आधीपासून अस्तित्वात असलेल्या अँटीबॉडीज काढून टाकणे हे खरोखरच आव्हानात्मक होते असे डॉ अमित यांनी स्पष्ट केले. एबीओ विसंगत प्रत्यारोपणामध्ये, शरीराला परकीय अवयव नाकारण्यापासून रोखण्यासाठी ऑपरेशनपूर्वी प्राप्तकर्त्यांना इम्युनोसप्रेसंट्स आणि रक्ताच्या प्लाझ्मा उपचाराचा एक प्रकार द्यावा लागतो. क्षयरोगामुळे तिला अधिक इम्युनोसप्रेसेंट्स देणे धोक्याचे होते आणि त्यामुळे तिचे क्षयरोग उपचार पूर्ण झाल्यानंतरच प्रत्यारोपणाचा निर्णय घेण्यात आला. अमोल पाटील, किडनी ट्रान्सप्लांट सर्जन, डॉ. अमित लंगोटे यांच्यासमवेत एबीओ-विसंगत किडनी प्रत्यारोपण यशस्वीपणे पार पाडून आता रुग्ण पूर्णतः बरा झाला आहे. हल्लीच हे प्रत्यारोपण करण्यात आले. आम्ही पालकांचे समुपदेशन केले आणि त्यांना सांगितले की तिला जगण्यासाठी प्रत्यारोपणाची नितांत गरज आहे. तिची आई किडनी दान करण्यासाठी पुढे सरसावली. नेहाला प्रत्यारोपणाच्या आधी आणि नंतर इम्युनोसप्रेसंट औषधे दिली गेली आणि एका आठवड्याभरात तिचे नवीन मूत्रपिंड उत्कृष्ट कार्य करत असून तिला आता घरी सोडण्यात आले आहे. रुग्णाची आई सांगते की, आई म्हणून माझ्या मुलीला अशा अवस्थेत पाहणे असह्य होते. मी कोणतीही शंका न बाळगता मुलीचा जीव वाचविण्याकरिता माझी किडनी दान करण्याचा निर्णय घेतला आणि मेडिकव्हरच्या डॉक्टरांनी ही शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडत दिला नव्याने जीनदान दिले.थोडे नवीन जरा जुने