महिला दिनाचे औचित्य साधत अबोली महिला रिक्षा संघटनेचे मुख्यमंत्र्यांना विविध मागण्यांचे निवेदन





पनवेल दि.०९ (वार्ताहर): महिला अबोली रिक्षा संघटनेची स्थापना ही महिला दिनीच 2018 साली करण्यात आली. महिला रिक्षा चालकांना भेडसावणार्‍या समस्या सोडविण्यासाठी महिला दिनाचे औचित्य साधत मुख्यमंत्र्यांना संकेतस्थळावर निवेदन पाठविण्यात आले आहे. लवकरच प्रत्यक्षात भेट घेवून या संदर्भात चर्चा करणार असल्याचे संस्थापक अध्यक्ष संतोष भगत यांनी सांगितले.



             महाराष्ट्रातील पहिली अबोली महिला रिक्षा संघटनेची स्थापना पनवेल येथे करण्यात आली. त्यानंतर संघटनेचा विस्तार हा कळंबोली, नेरुळ, कर्जत, कल्याण, डोंबिवली, खोपोली, कर्जत, अबंरनाथ, बदलापूर, घणसोली, रबाळे, मानखूर्द अशा अनेक शाखा आज कार्यरत आहेत. स्थापनेपासूनच या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संतोष भगत हे या महिला रिक्षा चालकांना भेडसावणार्‍या समस्या सोडविण्यासाठी झटत आहेत. महिलांना रिक्षा व्यवसाय करत असताना अनेक अडचणी येत असतात.


 साधारणपणे मुंबई, नवी मुंबईमध्ये 1500 महिला रिक्षा चालवून आपला उदरनिर्वाह करीत आहेत. यापूर्वीच्या सरकारकडेही आम्ही ईमेल द्वारे निवेदन दिले होते. परंतु त्यावर काहीच उत्तर मिळाले नसल्याचेही या निवेदनात म्हटले आहे. या संघटनेच्या माध्यमातून आम्ही महिलांना भेडसावणारे प्रश्‍न सोडवित गेलो. परंतु आज आमचे शासनदरबारी अनेक मुद्दे प्रलंबित आहेत. त्यापैकी मुख्य मुद्दा म्हणजे महिला रिक्षा चालकांना स्वतंत्र थांबे मिळणे गरजेचे आहे. कल्याण व डोंबिवली येथील अबोली महिला रिक्षा चालकांना स्वतंत्र थांबे मिळावेत यासाठी महानगरपालिका, आरटीओ यांना निवेदन देवून आज वर्षाचा कालावधी लोटला तरीही त्यावर अद्यापही तोडगा निघालेला नाही.काही अडचणी या शासनदरबारीच सोडविल्या जावू शकतात. महिलांना रिक्षा चालकांना भेडसावणारी मुख्य समस्या म्हणजे स्वतंत्र थांबे नसणे. यासाठी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना या समस्या सोडविण्यासाठी महिला दिनानिमित्त एक निवेदन संकेतस्थळावर पाठविण्यात आले आहे. लवकरच मुख्यमंत्र्यांना प्रत्यक्ष भेटून या समस्यांवर चर्चा करण्यात येणार आहे.



थोडे नवीन जरा जुने