मोटार सायकलीची चोरी

पनवेल दि.१२(वार्ताहर): नवीन पनवेल कडे जाणाऱ्या ब्रिजच्या कामबंद बंद पडलेल्या इमारतीच्या समोर असलेल्या सर्व्हिस रोडवर उभी करून ठेवलेली दुचाकी मोटार सायकल अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना घडली आहे.शैलेश बेंडखळे यांनी त्यांची २० हजार रुपये किमतीची यामाहा कंपनीची लाल व चंदेरी रंगाची व समोरील काचेवर इंग्रजीमध्ये ओंकार असे लिहलेली गाडी क्रमांक एम एच ०१ एके ८२६६ ही मोटार सायकल उभी ठेवली असता अज्ञात चोरट्याने सदर गाडी चोरून नेल्याने याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.


थोडे नवीन जरा जुने