पनवेल दि. १२ (संजय कदम) : अहमदनगर येथील मढी येथे रंगपंचमीनिमित्त दरवर्षी होणाऱ्या यात्रेसाठी पनवेल मधून मोठ्या संख्येने नाथ भक्त रवाना झाले आहेत. युवासेनेचे राष्ट्रीय राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य रुपेश पाटील यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून या यात्रेला सुरुवात झाली. या यात्रेमध्ये जाणाऱ्या भाविकांसाठी शिवसेनेने मदतीचा हाथ दिला असून त्यांच्यासाठी बस, जेवण व नाश्त्याची सोय शिवसेनेतर्फे करण्यात आली.
शिवसेना पनवेल महानगरपालिका वार्ड क्रमांक १४ चे विभाग प्रमुख आणि युवा सेना प्रमुख ऍड आशिष पनवेलकर आणि रितेश पनवेलकर यांच्या प्रयत्नातून मढी येथे जाण्यासाठी या यात्रेसाठी जाणाऱ्या भाविकांसाठी बसची सोय करण्यात आली आहे. तसेच यात्रेसाठी जाणाऱ्या भाविकांसाठी प्रथमेश सोमण यांनी जेवणाची व्यवस्था, प्रसाद सोनावणे नाश्त्याची व्यवस्था तर महादेव खरात ह्यांनी फळांची व्यवस्था केली होती. या यात्रेमध्ये शाखाप्रमुख किरण कळवेकर, युवासेना शाखाप्रमुख ओमकार पनवेलकर, उपशाखाप्रमुख प्रतीक वाजेकर तसेच शिवसैनिक आणि स्थानिक रहिवाशी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
Tags
पनवेल