रोहित्रा मधून ७०० लिटर तेलाची चोरी

पनवेल दि.०३ (वार्ताहर): कामोठे येथील औद्योगिक जवाहरलाल वसाहतीमधील रोहित्रामधील ७०० लिटर तेलाची चोरी झाल्याने अनेक उद्योगांना काही तासांचा अखंडित वीज समस्येचा सामना करावा लागला. ६६ हजार रुपयांची तेल चोरी झाली असून या ठिकाणी असलेल्या रोहित्रा मधून अज्ञात चोरटयांनी वेळोवेळी येथील तेलाची चोरी केली आहे. या औद्योगिक वसाहतीमध्ये १० वेगवेगळी रोहित्रे आहेत. त्यामुळे सदर ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची मागणी करण्यात येत आहे. तसेच या परिसरात सुमारे ४० हजार वीज ग्राहक आहेत. या अचानकपणे विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने औद्योगिक वसाहतीसह या रहिवाश्यांना सुद्धा याचा फटका बसत आहे.


थोडे नवीन जरा जुने