उरण दि 17 (विठ्ठल ममताबादे) जूनी पेन्शन योजना लागू करावी तसेच विविध मागण्याच्या अनुषंगाने दि 14 मार्च 2023 पासून उरण मधील सर्वच शासकीय, निमशासकीय कार्यालया समोर बेमुदत संप सुरु झाल्याने त्याचा परिणाम नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर झालेला दिसून येत आहे. सलग, 3 दिवस संप सुरु आहे. आज दि. 17 रोजी संपाचा 4 था दिवस असून नगर परिषद, पंचायत समिती, तहसिल कार्यालय आदि शासकीय कार्यालयात शुकशुकाट दिसून येत आहे. सर्वच कर्मचारी शासकीय अधिकारी संपात सहभागी झाल्याने नागरिकांची अनेक कामे खोळंबली आहेत.
शासकीय कार्यालये ओस पडली असून शासकीय कामे बंद असल्याने त्याचा प्रचंड फटका सर्व सामान्य नागरिकांना बसला आहे. सर्वसामान्य नागरिकांना संपामुळे विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
Tags
उरण