16 एप्रिल रोजी पाणदिवे दत्त मंदिर येथे मोफत नेत्रतपासणी, मोतीबिंदू शिबीराचे आयोजन. 

उरण दि. 11 (विठ्ठल ममताबादे ) अनेक ज्येष्ठ नागरिकांना वृध्दापकाळात डोळ्यांचे मोठ्या प्रमाणात समस्या असतात. तसेच वय झाल्याने अनेक ज्येष्ठ नागरिकांना प्रवास करून हॉस्पीटलला जाणे शक्य नसते या गोष्टीचा विचार करून ज्येष्ठ नागरिक, आबाल वृद्धांना त्यांच्या परिसरातच डॉक्टर मार्फत डोळ्यांची मोफत तपासणी करून मोतीबिंदूचे मोफत ऑपरेशन करण्याच्या अनुषंगाने शंकरा आय हॉस्पिटल नवीन पनवेल आणि श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्था उरण, आम्ही पाणदिवेकर समूह, आई इंटरप्रायजेस पाणदिवे,न्हावा शेवा सीएचए संघटना यांच्या संयुक्त्त विद्यमाने रविवार दि 16/4/2023 रोजी सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत श्री दत्त मंदिर, परशुराम पाटील इंग्लिश मिडियम स्कूल समोर पाणदिवे येथे मोफत नेत्र तपासणी व मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन, माफक दरात चष्मे वाटपचे आयोजन करण्यात आले आहे. मोतीबिंदू शस्त्रक्रीयेसाठी येणाऱ्या रुग्णांनी येताना सोबत आधार कार्ड व रेशन कार्डची झेरॉक्स प्रत घेऊन यावे. मधूमेहाची व रक्तदाबाची औषधे सुरु असल्यास ती देखील घेऊन यावे. पेशंटला ऑपरेशनसाठी जाण्याची, राहण्याची, जेवणाची मोफत सोय केलेली आहे. मोतीबिंदू ऑपरेशनही मोफत करण्यात येणार आहे.तेव्हा जास्तीत जास्त नागरिकांनी मोफत नेत्रतपासणी व मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रीया शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क साधा.
किरण पाटील 8291080130,

अमित पाटील - 9167165152

रुपेश भगत- 9619395292

 विठ्ठल ममताबादे-9702751098, -


थोडे नवीन जरा जुने