माजगांव आंबिवली येथे कराटे प्रशिक्षण,युनायटेड शोतोकान कराटे असोसिएशन ऑफ इंडिया या संस्थेचा संजय पाटील ४ डिग्री ब्लँक बेल्ट यांचा पुढाकार





माजगांव आंबिवली येथे कराटे प्रशिक्षण,युनायटेड शोतोकान कराटे असोसिएशन ऑफ इंडिया या संस्थेचा संजय पाटील ( ४ डिग्री ब्लँक बेल्ट) यांचा पुढाकार
                  काशिनाथ जाधव : प्रतिनिधी
पाताळगंगा १२ एप्रिल 
             लहान मुलांमध्ये आत्मविश्वास वाढावा शिवाय आजच्या बदलत्या काळात मुला - मुली सुरक्षित राहावे,त्यांच्यावर कोणतेही प्रसंग निर्माण झाल्यास त्यांच्याशी सामना करण्यांची साहस आपल्या मध्ये असावे हवे,विशेष म्हणजे ग्रामीण भागातील मुली मध्ये शारिरीक कौशल्य असावे त्यांनी निर्भीड पणे कोणत्याही प्रसंगाला सामोरे जाता यावे या उद्दात विचारांतून मुख्य प्रशिक्षक संजय पाटील यांनी शोतोकान कराटे असोसिएशन ऑफ इंडिया या संस्थेचा माध्यमातून माजगांव - आंबिवली येथे कराडे प्रशिक्षण चे आयोजन करण्यात आले. या मध्ये १२ खेळाचे प्रशिक्षण देण्यात येणार असल्यांचे सांगितले.




                या खेळाचे प्रशिक्षण मध्ये विविध प्रकारचे खेळ शिकविले जाणार आहे.यामध्ये कराटे, बॉक्सिंग,जुडो,योगा, कमांडो ट्रेनिंग ,मर्दानी खेळ शिकविले जाणार आहेत.शिवाय हे खेळ आपण तालुका,जिल्हा,राज्य स्तरीवर सुद्धा खेळले जावू शकता.या माध्यमातून स्वताला फिटनेस बनवून शकतो.शिवाय उत्तम खेळयांस आपणांस विविध ठिकाणी खेळण्यांस प्रोत्साहन मिळाले जाईल,प्रत्येक जण कोणत्याही खेळामध्ये तरबेज होवु शकता.मात्र त्यासाठी आपल्याकडे हे खेळ शिकण्यांची इच्छा प्रबळ असणे गरजेचे आहे.



         यावेळी या संस्थेचे अध्यक्ष डॉ. मंदार पनवेलकर,पीयुष सर,नरेंद्र शिंदे,अमित जोशी, महिला प्रशिक्षक तेजल पाटील अदिच्या माध्यमातून या विद्यार्थ्यांना या खेळांची ट्रेनिंग देण्यात येणात आहे.
यावेळी या परिसरातील अनेक विद्यार्थ्यांनी या खेळामध्ये सहभाग घेतला.विद्यार्थ्यांना एकत्र घेवून या खेळाचे प्रशिक्षण देण्यात यावेळी या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर समाधानांचे हास्य पहावयास मिळाले.





           यावेळी जयवंत पाटील, विलास कांबळे, जयेश काठावले, आत्माराम काठावले, राजेश पाटील, मंगेश पाटील, ज्ञानेश्वर पाटील, प्रदिप पाटील, राहुल पाटील, शशिकांत ढवाळकर, प्रमोद काठावले, भगवान जाधव. जनार्दन जाधव, जयश्री जाधव,भारती जाधव, संतोष जाधव. तुकाराम जाधव, रमेश लभडे,काशिनाथ पाटील,नरेश पाटील, आदी या परिसरातील तरूण वर्ग मान्यवर उपस्थित होते.त्याच बरोबरच आलेल्या मान्यवरांचे ग्रामस्थांच्या हस्ते पुष्प गुच्छ देवून स्वागत करण्यात आले.


थोडे नवीन जरा जुने