संयुक्त जयंती महोत्सव 2023 चे आयोजन. उरण दि 11 (विठ्ठल ममताबादे ) छत्रपती राजाराम महाराज मित्र मंडळ, भिमराज ग्रुप, डी.के.ग्रुप 
उरण यांच्या संयुक्त विदयमाने शुक्रवार दि. 14 एप्रिल 2023 व 15 एप्रिल 2023 रोजी उरण मध्ये संयुक्त जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.दिनांक 14 एप्रिल 2023 रोजी सकाळी 9 ते 1 भव्य मिरवणूक रॅली, दुपारी 1 ते 3 सामूहिक सहभोजन, सायंकाळी 6 ते 10 मान्यवरांचे सत्कार व संगीत कार्यक्रम तर दिनांक 15 एप्रिल 2023 रोजी सायंकाळी 4 ते 5 मान्यवरांचे सत्कार,5 ते 8 प्राध्यापक सुनील देवरे सर यांचे शिवराय ते भिमराय या विषयावर व्याख्यान, रात्री 8 ते 10 सहभोजन असे दिवसभर विविध कार्यक्रमाचे आयोजन उरण नगरपरिषद मैदान शाळा न 1, पेन्शनर्स पार्क,उरण शहर येथे करण्यात आले आहे. छत्रपती राजाराम महाराज मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष सुनिल गायकवाड, उपाध्यक्ष दिनेश गायकवाड, कार्यालयीन अध्यक्ष विजय लोढेकर,सहसचिव लक्ष्मण वाल्मिकी, भिमराज ग्रुपचे अध्यक्ष रविंद्रे देठे, सचिव - अमर ननावरे, बसपा नेते संतोष पाटील ,बसपा अध्यक्ष सलीम खान, छत्रपती राजाराम महाराज मित्र मंडळाचे सचिव सुहास कोळी, सहखजिनदार संतोष मोघे, खजिनदार विकास निकाळजे, ज्येष्ठ सल्लागार प्रभाकर जाधव,जेष्ठ सल्लागार मनोज लोणारे, महिला अध्यक्ष अरुणा कांबळे, महिला संघटक-वंदना नगराळे आदी पदाधिकारी हे संयुक्त जयंती महोत्सव 2023 यशस्वी करण्यासाठी विशेष मेहनत घेत आहेत.


थोडे नवीन जरा जुने