बौद्धजन पंचायत समिती उरण तर्फे भीमजयंतीचे आयोजन.


उरण दि ११(विठ्ठल ममताबादे ) बौद्धजन पंचायत समितीची स्थापना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केली असून आनंदराज आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण भारतात बौध्दजन पंचायत समिती कार्यरत आहे.बौद्धजन पंचायत समिती उरण शहर शाखा क्रं.८४३ व माता रमाई महिला मंडळ उरण बौद्धवाडी यांच्या वतीने शुक्रवार दि. १४ एप्रिल २०२३ ते १७ एप्रिल २०२३ दरम्यान भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न,महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती उरण शहरात पोलीस स्टेशनच्या मागे असलेल्या बौद्धवाडा येथे विविध धार्मिक, सामाजिक उपक्रमाद्वारे मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार आहे.१३ एप्रिल २०२३ रोजी सायं. ७:०० वा.बुगी बुगी कार्यक्रम गॅदरींग

१४ एप्रिल २०२३ रोजी सकाळी ९:३० वा.सामुहिक बुद्धपुजा बुद्धविहार उरण-बौद्धवाडी,
सकाळी १०:०० वा. ध्वजारोहण

सकाळी १०:३० वा. सामुहिक बुद्धपुजा - डॉ. बाबासाहेब आंबेडकर बालोद्यान उरण
दुपारी ३:०० वा.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणुक

१५ एप्रिल २०२३ रोजी सायंकाळी ६:३० वा.प्राध्यापक विजय मोहिते (सिध्दार्थ कॉलेज, मुंबई) व्याख्यान : बाबासाहेबांची धम्मक्रांती आणि सध्य स्थिती, महिला मंडळ सांस्कृतिक खेळ व कार्यक्रम

१६ एप्रिल २०२३ रोजी सायं. ७:०० वा.गायक संतोष घाडगे (सिने पार्श्व गायक) व सुहासिनी शिंदे (सिने पार्श्व गायिका) यांचा भीमगीतांचा कार्यक्रम

१७ एप्रिल २०२३ रोजी रात्रौ ९:३० वा. क्रांतीचा वणवा ऑर्केस्ट्रा आदी विविध धार्मिक, सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
बौध्दजन पंचायत समितीचे शाखा क्रं.८४३ कमिटीचे अध्यक्ष प्रकाश कांबळे, उपाध्यक्ष हरेश जाधव, उपाध्यक्ष अखिलेश जाधव, चिटणीस विजय पवार, खजिनदार अनंत जाधव, सहखजिनदार सुरेश गायकवाड, बौद्धा चार्य - महेंद्र साळवी, सहचिटणीस रोशन गाढे, कार्याध्यक्ष हर्षद कांबळे , बौद्धाचार्य प्रमोद कांबळे , संदेशवाहक- अजय कवडे , संकेत साळवी, माता रमाई महिला मंडळ कमिटीचे अध्यक्ष-सुनिता सपकाळे, उपाध्यक्ष संगिता जाधव, सचिव करुणा भिंगावडे,खजिनदार - सविता साळवी, सहखजिनदार- चंद्रभागा जाधव, संदेशवाहक - सुजाता साळवी आदी बौध्दजन पंचायत समिती उरण व माता माता रमाई महिला कमिटीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष मेहनत घेत आहेत.


थोडे नवीन जरा जुने