बनावट कागदपत्र वापरून अनधिकृतपणे वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी कुटुंबाचा पनवेल शहर पोलिसांच्या गोपनीय व पासपोर्ट विभागाने केला पर्दाफाश





बनावट कागदपत्र वापरून अनधिकृतपणे वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी कुटुंबाचा पनवेल शहर पोलिसांच्या गोपनीय व पासपोर्ट विभागाने केला पर्दाफाश
पनवेल दि.११ (संजय कदम) : भारतीय नागरीक नसतानाही भारतातील बनावट कागदपत्र बनवून सुमारे तीन वर्षापासून अनधिकृतपणे पनवेल शहरातील पटेल मोहल्ला तसेच मुंबई परिसरात वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी महिला व तिच्या पतीचा पनवेल शहर पोलिसांच्या गोपनीय व पासपोर्ट विभागाने पर्दाफाश करीत सदर महिलेला ताब्यात घेतले आहे.



                       आरोपी आयत मुल्ताणी हीने ती बांगलादेश नागरीक असल्याचे माहीती असूनसुद्धा भारतीय पासपोर्ट मिळविण्यासाठी राष्ट्रीयत्वाचा पुरावा म्हणून मुंबई येथील बनावट जन्मप्रमाणपत्र व इतर कागदपत्रे बनवली. त्या बनावट कागदपत्रांच्या सहाय्याने पनवेल शहर पोलीस ठाणे तसेच विदेश मंत्रालय, भारत सरकार यांचे कार्यालयात पासपोर्ट काढण्याकरीता अर्ज केला. मात्र पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने यांच्या मार्गदर्शनाखाली गोपनीय व पासपोर्ट विभागाचे सहाय्यक फौजदार संजय धारेराव, पोलीस हवालदार गौतम भोईर, पोलीस नाईक



 भाऊसाहेब लोंढे व पोलीस नाईक किरण सोनावणे हे तिच्या कागदपत्रांची तपासणी करत असताना त्यांना सदर कागदपत्रे हि बनावट असल्याचे आढळून आले. याबाबतची माहिती त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली. त्यानुसार पोलिसांनी अधिक चौकशी केली असता सदर महिला मूळची बांगलादेशी असून तिचे मूळ नाव मेहबुबा अख्तरपॉपी मुज्जफर हुसैन असल्याची माहिती मिळाली. तसेच ती अनधिकृतपणे पनवेल शहरातील पटेल मोहल्ला तसेच मुंबईतील मालाड परिसरात वास्त्यव्य करत असल्याची चौकशीत आढळून आले. त्यानुसार पनवेल शहर पोलिसांनी आरोपी महिला आयत खलील मुल्ताणी तसेच तिचा पती खलील अजमेरी मुल्ताणी (रा.मुंबई) यांच्याविरोधात कारवाई करत ताब्यात घेण्यात आले आहे तसेच त्यांच्याविरुद्द भारतीय पासपोर्ट अधिनियम 1950 चे कलम 3 (अ) 6 (अ) सह विदेशी नागरीक अधिनियम 1946 चे कलम 14 (अ) सुधारणा अधिनियम 2004 सह भादंवि कलम 420, 464, 466, 467, 468, 470, 471, 34 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत शेडगे करत आहेत.




थोडे नवीन जरा जुने