कारखान्यात बनवण्यासाठी दिलेले दागिने घेऊन कामगार फरार


कारखान्यात बनवण्यासाठी दिलेले दागिने घेऊन कामगार फरार 
पनवेल दि.११ (संजय कदम) : काम करत असलेल्या कारखान्यातुन बनवण्यासाठी दिलेले ५५ ग्रॅम सोन्याचे दागिने घेऊन कामगार फरार झाल्याची घटना पनवेल शहरातील प्रियंका सुवर्णकार कारखान्यात घडली आहे.  फिर्यादी बासुदेव आदक यांचे पनवेल शहरात प्रियंका सुवर्णकार नावाचे सोन्याचे दागिने बनवण्याचे कारखाना आहे. या कारखान्यात काम करणारा कामगार संदिप फनी भुषण रॉय (वय ३८, रा.पश्चिम बंगाल) याने कारखान्यातुन त्याला बनवण्यासाठी दिलेले ३ लाख रुपये किमतीचे चैन, मनी, भुगा, तार असे ५५ ग्राम वजनाचे सोन्याचे दागिने घेऊन फरार झाला आहे. याप्रकरणी बासुदेव आदक यांनी पनवेल शहर पोलीस ठाण्यात चोरीची तक्रार दाखल केली आहे.


थोडे नवीन जरा जुने