मत्यस्यगंधा एक्स्प्रेसमधून ९३ हजारांचा मद्यसाठा जप्त; रेल्वे पोलीस आणि उत्पादन शुल्क विभागाची संयुक्त कारवाई


*मत्यस्यगंधा एक्स्प्रेसमधून ९३ हजारांचा मद्यसाठा जप्त; रेल्वे पोलीस आणि उत्पादन शुल्क विभागाची संयुक्त कारवाई*
पनवेल दि.११ (संजय कदम) : मत्स्यगंधा एक्सप्रेसमधून पनवेल रेल्वे पोलीस आणि उत्पादन शुल्क विभागाने संयुक्त कारवाई करत ९३ हजारांची गोवा बनावटीची दारू जप्त केली आहे. याप्रकरणी दोन महिलांना ताब्यात घेण्यात आले आहे.                   मुंबई ते मंगलोर रेल्वेमार्गावर धावणाऱ्या मत्स्यगंधा एक्सप्रेसमध्ये गोवा बनावटीच्या दारूची तस्करी होत असल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती. त्यानुसार मत्स्यगंधा एक्स्प्रेस पनवेल रेल्वे स्टेशनवर आल्यावर पनवेल रेल्वे पोलीस आणि उत्पादन शुल्क विभागाने संयुक्त कारवाई करत ९३ हजारांची गोवा बनावटीची दारू जप्त केली आहे. याप्रकरणी दोन महिलांना ताब्यात घेण्यात आले आहे. या महिला हे मद्यसाठा आंध्र प्रदेश येथे घेऊन जात असल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाकडून देण्यात आली आहे.
थोडे नवीन जरा जुने