शांतादेवीची यात्रा मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावात संपन्नशेलघर गव्हाण पंचक्रोशीतील गव्हाण, कोपर, शिवाजीनगर आणि शेलघर या चार गावांची ग्रामदेवता असलेल्या शांतादेवीची यात्रा मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावात संपन्न झाली. या निमीत्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी शातादेवीचे मनोभावे दर्शन घेतले तसेच भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनीही सपत्नीक शांतादेवी मंदिराला भेट देत देवीचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी ज्येष्ठ नेते वाय. टी. देशमुख, भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, गव्हाण ग्रामपंचायतीचे उपसरपंच विजय घरत, भाजप वाहतुक सेलचे हेमंत ठाकूर, जयवंत देशमुख, विश्वनाथ कोळी, अनंता ठाकूर, वसंत म्हात्रे, यांच्यासह ग्रामस्थ आणि मान्यवर उपस्थित होते.


थोडे नवीन जरा जुने