देशाचे गृह व सहकार मंत्री अमित शाह यांना शिवसेना महानगर प्रमुख प्रथमेश सोमण यांनी श्री ज्येष्ठराज सिद्धिविनायकाची प्रतिमा दिली भेट


देशाचे गृह व सहकार मंत्री अमित शाह यांना शिवसेना महानगर प्रमुख प्रथमेश सोमण यांनी श्री ज्येष्ठराज सिद्धिविनायकाची प्रतिमा दिली भेटपनवेल दि.१६(संजय कदम): देशाचे गृह व सहकार मंत्री अमित शाह हे तीर्थरूप आप्पासाहेब धर्माधिकारी यांना देण्यात येणाऱ्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार २०२२ या सोहळ्यासाठी खारघर येथे आज आले होते. या साठी हेलीकॉप्टरने खारघर येथे दाखल झाले. त्यावेळी हेलिपॅडवर शिवसेना पनवेल महानगर प्रमुख तथा मा.नगरसेवक ऍडव्होकेट प्रथमेश चंद्रशेखर सोमण यांनी अमित शाह यांची भेट घेऊन त्यांना पनवेल मधील प्रसिद्ध श्री ज्येष्ठराज सिद्धिविनायकाची प्रतिमा त्यांना भेट दिली आणि त्यांचे स्वागत केले.       यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेनेचे पनवेल जिल्हा संपर्क प्रमुख रामदास शेवाळे यांच्यासह इतर अनेक मान्यवर उपस्थित होते. दरम्यान हेलिपॅड वर स्वागत करण्याची संधी दिल्याबद्दल प्रथमेश सोमण यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले आहेत.थोडे नवीन जरा जुने