पनवेल मधील कुंभारवाडा येथील ग्रामदेवता जरीमरी देवीचा जत्रा उत्सव सोहळा संपन्न

पनवेल मधील कुंभारवाडा येथील ग्रामदेवता जरीमरी देवीचा जत्रा उत्सव सोहळा संपन्न पनवेल दि.१२ (संजय कदम) : पनवेल शहरातील कुंभारवाडा येथील ग्रामदेवता जरीमरी देवीचा जत्रा
उत्सव सोहळा संपन्न झाला. विविध धार्मिक कार्यक्रमांद्वारे जरीमरी देवीचा जत्रा उत्सव सोहळा मोठया भक्तीभावाने संपन्न झाला.संत गोरा कुंभार प्रतिष्ठान पनवेल व कुंभारवाडा युवक मंडळ व इतर कुंभारवाडामधील नागरीक या जत्रा उत्सवामध्ये मोठया भक्ती भावांने सहभागी झाले होते. तसेच सकाळी पुजन, संध्याकाळी देवीची सार्वजनिक आरती, रात्री भजनाचा कार्यक्रम मोठया भक्तीभावाने उत्साहात संपन्न झाला या वेळी संपुर्ण कुंभारवाडयातील नागरीक व समाज बांधव उपस्थित होते.थोडे नवीन जरा जुने