मंगळसूत्र हिसकावून चोरटा पसार


मंगळसूत्र हिसकावून चोरटा पसार
पनवेल दि.१२ (वार्ताहर) : भाजीपाला खरेदीसाठी गेलेल्या महिलेच्या गळ्यातील ५० हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी हिसकावून पसार झाल्याची घटना कळंबोलीमध्ये घडली आहे. याप्रकरणी अज्ञात दुचाकीस्वारांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.          कळंबोली सेक्टर ८ मध्ये राहणाऱ्या प्रभावती राजे यांचा राजे ह्या पतीसोबत भाजीपाला व फळे विकत घेण्यासाठी मार्केटमध्ये गेल्या होत्या. भाजीपाला विकत घेत असताना मोटारसायकलवरून आलेल्या चोरट्यांनी गळ्यातील सव्वातोळे वजनाचे मंगळसूत्र हिसकावून पळ काढला. याप्रकरणी कळंबोली पोलीस ठाण्यात अज्ञात दुचाकीस्वारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


थोडे नवीन जरा जुने